निवांत

आताशा वाटतं
बसावं इथंच निवांत
क्षणांचे शिंपले वेचत
आणि पहावं दूर मागे
त्या वाटांकडे
जिथून आले होते ते
सुखदुःखांचे वारे..

आयुष्याचं गणित मांडून
सोडून द्यावेत जुने हिशोब
आणि बसावं इथंच निवांत
स्वप्नांचा कशिदा विणत...

-- आनंद पाटणकर



आताशा वाटतं
बसावं इथंच निवांत
क्षणांचे शिंपले वेचत
आणि पहावं दूर मागे
त्या वाटांकडे
जिथून आले होते ते
सुखदुःखांचे वारे..

आयुष्याचं गणित मांडून
सोडून द्यावेत जुने हिशोब
आणि बसावं इथंच निवांत
स्वप्नांचा कशिदा विणत…

— आनंद पाटणकर

Author