कोंडमारा

बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे
कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे

फिकाफिकासा ... उदासवाणा... मलूल आहे असा बिचारा...
अजून चाफा अबोल आहे... अजूनही दु:खं आत आहे

खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली
तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे

जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे
तसा इथे सावलीतसुद्धा उभा खरा मी उन्हात आहे

तसे मला वाटले खरे ते मला कधी बोलता न आले
अजूनही जीभ चावण्याचा जुनाच माझा प्रघात आहे

पुन्हा पुन्हा युद्ध जिंकताना पुन्हा पुन्हा युद्ध हारलो मी
रणात मी धूळ चारलेली अजूनही संभ्रमात आहे !

अजून तू पान पान माझे कुठे तसे वाचलेस आहे ...?
अजूनही ओळ ओळ माझी कुठे तुझ्या काळजात आहे?

मनाप्रमाणे जगावयाचा विचारही दूर ठेवला मी !
मनातले मी मनात माझ्या तसेच ठेवून जात आहे ...

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे
कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे

फिकाफिकासा … उदासवाणा… मलूल आहे असा बिचारा…
अजून चाफा अबोल आहे… अजूनही दु:खं आत आहे

खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली
तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे

जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे
तसा इथे सावलीतसुद्धा उभा खरा मी उन्हात आहे

तसे मला वाटले खरे ते मला कधी बोलता न आले
अजूनही जीभ चावण्याचा जुनाच माझा प्रघात आहे

पुन्हा पुन्हा युद्ध जिंकताना पुन्हा पुन्हा युद्ध हारलो मी
रणात मी धूळ चारलेली अजूनही संभ्रमात आहे !

अजून तू पान पान माझे कुठे तसे वाचलेस आहे …?
अजूनही ओळ ओळ माझी कुठे तुझ्या काळजात आहे?

मनाप्रमाणे जगावयाचा विचारही दूर ठेवला मी !
मनातले मी मनात माझ्या तसेच ठेवून जात आहे …

…. देवीदास हरिश्चंद्र पाटील

Author