नातं जिवा-भावाचं
सढळ.....अढळ !
नातं प्रिती-प्रेमाचं
रसाळ .....मधाळ !
नातं राग-लोभाचं
खट्याळ.....स्नेहाळ !
नातं दुःख - हर्षाचं
उदास .....उधाण !
नातं विरहात
एकटे व्याकुळ !
नातं मनांत
सूर गात्रात !
नात्याची गुंफण
रेशमी....रेशमी !
बंध रेशमाचे
अखंड....अतूट !
कस नात्याचा
झळाळे सुवर्ण !
पाईक नात्याचा
पवित्र ....पावन !
बाज नात्याचा
मस्त उनाड !
साज नात्याचा
प्रेम ....आदर !!
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.
नातं जिवा-भावाचं
सढळ…..अढळ !
नातं प्रिती-प्रेमाचं
रसाळ …..मधाळ !
नातं राग-लोभाचं
खट्याळ…..स्नेहाळ !
नातं दुःख – हर्षाचं
उदास …..उधाण !
नातं विरहात
एकटे व्याकुळ !
नातं मनांत
सूर गात्रात !
नात्याची गुंफण
रेशमी….रेशमी !
बंध रेशमाचे
अखंड….अतूट !
कस नात्याचा
झळाळे सुवर्ण !
पाईक नात्याचा
पवित्र ….पावन !
बाज नात्याचा
मस्त उनाड !
साज नात्याचा
प्रेम ….आदर !!
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.