प्रेम

प्रथम तिज पहाता
अग्नी मनी चेतला ,
झालो बेधुंद मी
अंतरी वणवा पेटला !

आर्त नजर तिची
मन घायाळ करून गेली
एकमेकात गुंतलो आम्ही ....
मनोदेवता सांगून गेली !

खट्याळ चमक तिच्या नेत्री
स्वर्ग सुख पाझरले गात्री
त्या क्षणी गेलो हरवून
ती माझी,मी तिचा बनून !

होऊनी एकाकी जेंव्हा ..
मोजतो अंधारी तारे ,
अलगद चाहुलीने तिच्या
फुटती नवे धुमारे !

जेंव्हा दुखी बुडे आकंठ
उरे जीवनी नुसती खंत
पुरे तिची चाहूल आगळी
जीवनी येई नवी झळाळी !

क्षणो क्षणी वाटत राही
तिच्यात मी सहचरी पाही
झाले दूर सगळे अज्ञान
जुळता, तिचे मन माझे मन !

© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.



प्रथम तिज पहाता
अग्नी मनी चेतला ,
झालो बेधुंद मी
अंतरी वणवा पेटला !

आर्त नजर तिची
मन घायाळ करून गेली
एकमेकात गुंतलो आम्ही ….
मनोदेवता सांगून गेली !

खट्याळ चमक तिच्या नेत्री
स्वर्ग सुख पाझरले गात्री
त्या क्षणी गेलो हरवून
ती माझी,मी तिचा बनून !

होऊनी एकाकी जेंव्हा ..
मोजतो अंधारी तारे ,
अलगद चाहुलीने तिच्या
फुटती नवे धुमारे !

जेंव्हा दुखी बुडे आकंठ
उरे जीवनी नुसती खंत
पुरे तिची चाहूल आगळी
जीवनी येई नवी झळाळी !

क्षणो क्षणी वाटत राही
तिच्यात मी सहचरी पाही
झाले दूर सगळे अज्ञान
जुळता, तिचे मन माझे मन !

© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.

Author