स्फूर्ती दाता

तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य

समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य १

तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती

प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती २

कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी

मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी ३

हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी

दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही ४

गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी

स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी ५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य

समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य १

तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती

प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती २

कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी

मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी ३

हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी

दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही ४

गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी

स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी ५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author