दया प्रेम भाव

दया प्रेम हे भाव मनी, जागृत कर तू भगवंता ।

तुला जाणण्या कामी येईल, हृदयामधली आद्रता ।। १

शुश्क मन हे कुणा न जाणे, धगधगणारे राही सदा ।

शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा ।। २

पाझर फुटण्या प्रेमाचा , भाव लागती एक वटूनी ।

उचंबळणारे ह्रदय तेथे, चटकन येईल मग दाटूनी ।। ३

दया प्रेम या भावांमध्ये, दडला आहे ईश्वर तो ।

मनांत येता हेच भाव , दर्शन त्याचे घडवूनी जातो ।। ४

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author