वेळेची ढिलाई.. कामाची किमया

हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील

बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?...१,

नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा

मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा....२,

अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी

सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी....३,

काळ येई परि वेळ न आली, म्हणून सदा तूं हताश होतो

वेळेची ही ढिलाइ बघूनी, तांडव नृत्य ते करितो...४,

शांत होऊ दे क्रोध तुझा तो, बळी कुणाचा राग कुणावरी

‘वेळवरती’ अवलंबूनी तूं, जाण ठेव मनी याची तरी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील

बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?…१,

नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा

मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा….२,

अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी

सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी….३,

काळ येई परि वेळ न आली, म्हणून सदा तूं हताश होतो

वेळेची ही ढिलाइ बघूनी, तांडव नृत्य ते करितो…४,

शांत होऊ दे क्रोध तुझा तो, बळी कुणाचा राग कुणावरी

‘वेळवरती’ अवलंबूनी तूं, जाण ठेव मनी याची तरी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author