देह मंदीर

शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला

ठेवूनी ती आठवण, चांगले ठेवा देहाला...१

व्यायाम व आहार, असतां नियमित

सुदृढ ते शरीर, असते मग बनत...२

सुदृढ असता देह, करावे मनाला शांत

टाळत असतां मोह, न येई तो भावनेत...३

षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी

निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी...४

देह आहे मंदीर, गाभारा तो मन

आत्मा तो ईश्वर, आनंद देई आंतून...५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला

ठेवूनी ती आठवण, चांगले ठेवा देहाला…१

व्यायाम व आहार, असतां नियमित

सुदृढ ते शरीर, असते मग बनत…२

सुदृढ असता देह, करावे मनाला शांत

टाळत असतां मोह, न येई तो भावनेत…३

षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी

निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी…४

देह आहे मंदीर, गाभारा तो मन

आत्मा तो ईश्वर, आनंद देई आंतून…५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →

MS Team 

This is editor1