असुरक्षित जीवन

आज कुणाच काय भरवसा

रडते जीवन ढसाढसा // धृ //

प्रेम दिसेना जगांत कोठे

ह्रदया मधले सरले साठे

ओढ कुणाची कुणा न वाटे

ओरड करुनी कंठ न दाटे

सुकुनी गेला घसा

रडते जीवन ढसाढसा - – - १

बाप ना भाऊ इथे कुणाचा

लोप पावला कढ रक्ताचा

मायमाउली सहज विसरते

काळ तिचा तो नऊ मासाचा

फुटला नात्याचा आरसा

रडते जीवन ढसाढसा – - – 2

सुरक्षतेचे कवच दिसेना

शब्दावरी विश्वास बसेना

दुर्मिळ झाली त्याग भावना

कदर कुणाची कुणी करेना

इथे लागतो केवळ पैसा

रडते जीवन ढसाढसा – - – ३

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



आज कुणाच काय भरवसा

रडते जीवन ढसाढसा // धृ //

प्रेम दिसेना जगांत कोठे

ह्रदया मधले सरले साठे

ओढ कुणाची कुणा न वाटे

ओरड करुनी कंठ न दाटे

सुकुनी गेला घसा

रडते जीवन ढसाढसा – – – १

बाप ना भाऊ इथे कुणाचा

लोप पावला कढ रक्ताचा

मायमाउली सहज विसरते

काळ तिचा तो नऊ मासाचा

फुटला नात्याचा आरसा

रडते जीवन ढसाढसा – – – 2

सुरक्षतेचे कवच दिसेना

शब्दावरी विश्वास बसेना

दुर्मिळ झाली त्याग भावना

कदर कुणाची कुणी करेना

इथे लागतो केवळ पैसा

रडते जीवन ढसाढसा – – – ३

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author