पूजा पाठ करीत असतां पूजा गेलो विसरुनी
प्रभुचरणी ध्यान लागतां भान गेले हरपूनी
पूजेमधल्या विधीमध्यें बहूत तास घालविले
मनी घेऊनी आनंदे पूजा कर्म केले
पूजेमधली सर्व कृतिं कटाक्षाने पाळली
नेटकेपणासाठी योग्य साधने जमविली
वर्षामागून वर्षे गेली पूजाअर्चा करुनी
खंत मनी राहून गेली झालो नसे समाधानी
मूर्ती समोर बसूनी एक चित्त झालो
ध्यान अचानक लागूनी स्वतःसी विसरलो
आनंदाचा मार्ग मिळाला देई खरे समाधान
पूजा विधीतील भावाला असे महत्वाचे स्थान
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पूजा पाठ करीत असतां पूजा गेलो विसरुनी
प्रभुचरणी ध्यान लागतां भान गेले हरपूनी
पूजेमधल्या विधीमध्यें बहूत तास घालविले
मनी घेऊनी आनंदे पूजा कर्म केले
पूजेमधली सर्व कृतिं कटाक्षाने पाळली
नेटकेपणासाठी योग्य साधने जमविली
वर्षामागून वर्षे गेली पूजाअर्चा करुनी
खंत मनी राहून गेली झालो नसे समाधानी
मूर्ती समोर बसूनी एक चित्त झालो
ध्यान अचानक लागूनी स्वतःसी विसरलो
आनंदाचा मार्ग मिळाला देई खरे समाधान
पूजा विधीतील भावाला असे महत्वाचे स्थान
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Post Views: 11