वातावरणाची निर्मिती

वातावरण निर्मित होते, जसे जातां वागूनी ।

हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी...१,

फिरत असती वलये , सारी अंवती भंवती ।

चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती...२,

जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी ।

चांगुलपणाचे भाव उमटती, आपोआप त्यावेळी....३,

जाता दुष्ट व्यक्ती , आपल्या जवळूनी ।

चलबिचल मन होते, केवळ सानिध्यानी.....४,

याच लहरी घुसुनी शरीरि, मनी आघांत करती ।

मनामध्ये बदल करूनी, तीच वृत्ती बनविती...५,

विहीरी वरच्या दगडांनाही, खुणा पडती जेथे ।

कसे टिकेल तन मन तेथे, नाजूक जे असते...६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



वातावरण निर्मित होते, जसे जातां वागूनी ।

हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी…१,

फिरत असती वलये , सारी अंवती भंवती ।

चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२,

जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी ।

चांगुलपणाचे भाव उमटती, आपोआप त्यावेळी….३,

जाता दुष्ट व्यक्ती , आपल्या जवळूनी ।

चलबिचल मन होते, केवळ सानिध्यानी…..४,

याच लहरी घुसुनी शरीरि, मनी आघांत करती ।

मनामध्ये बदल करूनी, तीच वृत्ती बनविती…५,

विहीरी वरच्या दगडांनाही, खुणा पडती जेथे ।

कसे टिकेल तन मन तेथे, नाजूक जे असते…६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author