देह – एक महान वस्ती

सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक ।

प्रत्येक जण स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।।

सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना ।

शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।।

अप्रतिम शहर असूनी, नाव तयाचे असे 'पुरूष' ।

'पुरू' म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे 'ईश ।।

अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी ।

विधात्याची वास्तूकला, अप्रतीम अजोड ठरे खरी ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक ।

प्रत्येक जण स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।।

सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना ।

शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।।

अप्रतिम शहर असूनी, नाव तयाचे असे ‘पुरूष’ ।

‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे ‘ईश ।।

Author