शिखरावरी बांधली मंदिरे

विचारांच्या उठती लहरी, वलये त्यांची होत असती ।

सुविचारांची वलये सारी, नभाकडे जात दिसती ।।

पवित्र निर्मळ विचारांच्या, तरल अशा लहरी असती ।

अशुद्ध साऱ्या विचारांची, जड लहरी तळात राहती ।।

फार पूरातन काळी देखील, उकल दिसते या गोष्टीची ।

पवित्रतेच्या सर्व स्थळांनी, शोधली जागा शिखरावरची ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author