जीवनाची उपयोगिता

अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची ।

मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जीवनाची....१,

वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरीर कुणाला ।

मना मारूनी बसावे लागे, एक जागी सर्वाला....२,

निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन ।

दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून...३,

बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले ।

दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व आज जाणले....४,

जेंव्हां असते स्वत: करीता, स्वार्थी भाव लपला असे ।

दुजासाठी करीता सारे , स्वार्थी भाव राहील कसे ?....५,

शेवटचे सरते जीवन, ईश चरणी समर्पण व्हावे ।

अंतिम विनंती हीच, दुजाच्या सेवेतच निघून जावे...६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची ।

मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जीवनाची….१,

वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरीर कुणाला ।

मना मारूनी बसावे लागे, एक जागी सर्वाला….२,

निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन ।

दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून…३,

बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले ।

दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व आज जाणले….४,

जेंव्हां असते स्वत: करीता, स्वार्थी भाव लपला असे ।

दुजासाठी करीता सारे , स्वार्थी भाव राहील कसे ?….५,

शेवटचे सरते जीवन, ईश चरणी समर्पण व्हावे ।

अंतिम विनंती हीच, दुजाच्या सेवेतच निघून जावे…६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author