काळजाच्या भेटी, आलीस सई गाठी,

काळजाच्या भेटी,आलीस सई गाठी,
खूण पटता आत्म्यांची,
किती आनंदी दिठी,--!!! ||१||

काळजाच्या भेटी
आलीस सखे राती
पूर गप्पांचा येता ,
वाढत जाय भरती,--!!! ||२||

काळजाच्या भेटी ,
आलीस मैत्रिणी,
जिवांचे दुवे सांधीत,
घट्ट हृदयाची नाती,--!!! ||३||

काळजाच्या भेटी,
आलीस सये पाठी,
सुखदुःखांच्या हिंदोळी,
दोघी बसू एकाच झुली,--!!! ||४||

काळजाच्या भेटी ,
आलीस तू सहेली,
सह राहुनी राहुनी,
केलीस दुःखे हलकी,--!!! ||५||

काळजाच्या भेटी,
आलीस माझ्यासाठी,
तुझ्यातील तू अन् ,
माझ्यातली मी,
द्वैतातील अद्वैतासाठी,--!!! ||६||

हिमगौरी कर्वे.©



काळजाच्या भेटी,आलीस सई गाठी,
खूण पटता आत्म्यांची,
किती आनंदी दिठी,–!!! ||१||

काळजाच्या भेटी
आलीस सखे राती
पूर गप्पांचा येता ,
वाढत जाय भरती,–!!! ||२||

काळजाच्या भेटी ,
आलीस मैत्रिणी,
जिवांचे दुवे सांधीत,
घट्ट हृदयाची नाती,–!!! ||३||

काळजाच्या भेटी,
आलीस सये पाठी,
सुखदुःखांच्या हिंदोळी,
दोघी बसू एकाच झुली,–!!! ||४||

काळजाच्या भेटी ,
आलीस तू सहेली,
सह राहुनी राहुनी,
केलीस दुःखे हलकी,–!!! ||५||

काळजाच्या भेटी,
आलीस माझ्यासाठी,
तुझ्यातील तू अन् ,
माझ्यातली मी,
द्वैतातील अद्वैतासाठी,–!!! ||६||

हिमगौरी कर्वे.©

Author