नववधू
नवासाज
लालेलाल
रंगी आज
खुले रंग
मेहंदीचा
प्रेमभाव
हा प्रीतीचा
हाती चुडा
भरला गं
येई आता
साजण गं
सलज्जता
वाढलीच
हाती हात
गुंफलीच
गौरवर्णी
हातावरी
मेहंदिची
नक्षी खरी
जाई आता
सासरला
गुंती मन
माहेराला
मनातुनी
बावरली
सख्या भेटी
आतुरली
मालत्यांनी
ओटी भरा
लेक जाई
तिच्या घरा
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Author
Post Views: 15