वसा आहे अवघड
तरी घ्यावा झटपट
थोडं तरी ज्ञानदान
देण्या करू खटपट
सावित्रीच्या आम्ही लेकी
व्रत घेतो स्वातंत्र्याचे
ठेवणार आता एकी
ठेचू डाव हो दुष्टांचे
जन्मदिनी सावित्रीच्या
नको सोहळे भाषणे
कर्तृत्वाने उजळूया
दाही दिशा सन्मानाने
सोसू सावू सम हाल
तरी द्या जशास तसा
धडा अमानुषतेला
सावित्रीचा वसा असा
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Author
Post Views: 14