मला जगायचंय तुझ्यासाठी

गेलास ना परदेशी लेकरा
भेट आता आपली होईल का?
दिर्घ आजाराने देह पिडीत
या त्रास मला रे सोसवेल का?

जिव गुंतला माझा तुमच्यात
आशा जागते इथे काळजात
या झडकरी तुम्ही भारतात
हितगुज साधुया आपसात

तुझ्या वडीलांनी गाठली साठी
लहान बहिण आहे रे पाठी
जीव तळमळतो भेटीसाठी
मला जगायचंय तुझ्यासाठी

-- सौ. माणिक (रुबी)



गेलास ना परदेशी लेकरा
भेट आता आपली होईल का?
दिर्घ आजाराने देह पिडीत
या त्रास मला रे सोसवेल का?

जिव गुंतला माझा तुमच्यात
आशा जागते इथे काळजात
या झडकरी तुम्ही भारतात
हितगुज साधुया आपसात

तुझ्या वडीलांनी गाठली साठी
लहान बहिण आहे रे पाठी
जीव तळमळतो भेटीसाठी
मला जगायचंय तुझ्यासाठी

— सौ. माणिक (रुबी)

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →