का मागे, मागे वळून पाहशी

विसर सर्व गतकाळां,
उगा मना रेगांळशी,
पुढे जाऊन, समोर पहा ,;---
का मागे, मागे वळून पाहशी,---!!!

मागे राहिला बालपणा,
त्यात कशाला हुंदडशी
चार सुखाचे थेंब दिसतां
सारे आभाळ पुन्हा पेलशी,--!!!

कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, सारख्या सारख्या विसरशी,
पाहून आपल्या भूतकाळां,
पुन्हा पुन्हा रे गहिंवरशी,--!!!

घरात माणसांचा राबता,
सांग आता कुठून आणशी,
अशा अनमोल दौलतीला,
तूच ना रे झुगारशी,--!!!?

येता काळ तरुणपणाचा,
तुला जाणीव नव्हती जराशी, गमावशील जर यांना,
कसे त्यांना परत आणशी,-?

एक एक करून सर्व तुला,
राजा, बघ सोडून जाती,
काळाची ही महान किमया,
नातीगोती संपून जाती,--!!!

आता उरला एकटेपणा,
जो जन्माचा सोबती,
दाबून टाक भूतकाळा,
वर्तमानच फक्त या जगी,--!!

हिमगौरी कर्वे. ©



विसर सर्व गतकाळां,
उगा मना रेगांळशी,
पुढे जाऊन, समोर पहा ,;—
का मागे, मागे वळून पाहशी,—!!!

मागे राहिला बालपणा,
त्यात कशाला हुंदडशी
चार सुखाचे थेंब दिसतां
सारे आभाळ पुन्हा पेलशी,–!!!

कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, सारख्या सारख्या विसरशी,
पाहून आपल्या भूतकाळां,
पुन्हा पुन्हा रे गहिंवरशी,–!!!

घरात माणसांचा राबता,
सांग आता कुठून आणशी,
अशा अनमोल दौलतीला,
तूच ना रे झुगारशी,–!!!?

येता काळ तरुणपणाचा,
तुला जाणीव नव्हती जराशी, गमावशील जर यांना,
कसे त्यांना परत आणशी,-?

एक एक करून सर्व तुला,
राजा, बघ सोडून जाती,
काळाची ही महान किमया,
नातीगोती संपून जाती,–!!!

आता उरला एकटेपणा,
जो जन्माचा सोबती,
दाबून टाक भूतकाळा,
वर्तमानच फक्त या जगी,–!!

हिमगौरी कर्वे. ©

Author