श्रीरामाची शिवपूजा

हरि हराचे पुजन करतो ।

दृष्य दिसे बहुत आगळे ।।

प्रभूकडूनी प्रभूची सेवा ।

सर्वजणां ही किमया न कळे ।।

शिवलिंगापुढती ध्यान लावी ।

डोळे मिटूनी प्रभू श्रीराम ।।

सुंदर सुबक चित्रामध्ये ।

व्यक्त होई ह्रदयातील प्रेम ।।

श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं ।

आत्मरुप उजळून आले ।।

शिवलिंगातील रामस्वरुप ।

एक होऊनी मग गेले ।।

कोण भक्त आणि ईश्वर कोण ? ।

भासे मनी हे अवघड कोडे ।।

परम बिंदूवर भक्ती असता ।

ईश्वर भक्त दूजा न सांपडे ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



हरि हराचे पुजन करतो ।

दृष्य दिसे बहुत आगळे ।।

प्रभूकडूनी प्रभूची सेवा ।

सर्वजणां ही किमया न कळे ।।

शिवलिंगापुढती ध्यान लावी ।

डोळे मिटूनी प्रभू श्रीराम ।।

सुंदर सुबक चित्रामध्ये ।

व्यक्त होई ह्रदयातील प्रेम ।।

श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं ।

आत्मरुप उजळून आले ।।

शिवलिंगातील रामस्वरुप ।

एक होऊनी मग गेले ।।

कोण भक्त आणि ईश्वर कोण ? ।

भासे मनी हे अवघड कोडे ।।

परम बिंदूवर भक्ती असता ।

ईश्वर भक्त दूजा न सांपडे ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author