पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।

फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।
त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।

उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।
वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।

कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।
वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।।

आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।
शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।।

भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।
बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।।

कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।
नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।।

ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।
पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Author