रात्र बहरली चंद्रप्रकाशे

रात्र बहरली चंद्रप्रकाशे,
पाण्यावर तरंगती रजतकण,
फांदी फांदी झुकुनी त्यावरी,
धरते सावली रक्षण्या कणकण,-!

अंधार प्रकाशी खेळे कसा, चंद्रमा ढगां--ढगांत विराजे, पानापानातून रजत नक्षी,
सृष्टीवर रुपेरी‌ प्रकाश पसरे,

कधी लपे सुधांशू हा,
या मेघातून त्या मेघात,
वातावरण जिवा वेड लावे,
जादूच फैलावे प्रेमीयुगलांत,-!

दूरवरीचे डोंगर बघती,
संथ शांत पाणी कसे,
कधी काळे कधी पांढरे,
कधी म्हणावे रुपेरी ही तसे,--!!!

हिमगौरी कर्वे



रात्र बहरली चंद्रप्रकाशे,
पाण्यावर तरंगती रजतकण,
फांदी फांदी झुकुनी त्यावरी,
धरते सावली रक्षण्या कणकण,-!

अंधार प्रकाशी खेळे कसा, चंद्रमा ढगां–ढगांत विराजे, पानापानातून रजत नक्षी,
सृष्टीवर रुपेरी‌ प्रकाश पसरे,

कधी लपे सुधांशू हा,
या मेघातून त्या मेघात,
वातावरण जिवा वेड लावे,
जादूच फैलावे प्रेमीयुगलांत,-!

दूरवरीचे डोंगर बघती,
संथ शांत पाणी कसे,
कधी काळे कधी पांढरे,
कधी म्हणावे रुपेरी ही तसे,–!!!

हिमगौरी कर्वे

Author