ऊन पडले कोवळे

ऊन पडले कोवळे,
धरणीवर तरंगत आले,
प्रकाशाचे खेळ सारे,
किरण हवे तसे रमले,--!!!

आकाशाचा गोल घुमट,
कसा तापून गेला,
किमया कशी तेजाची,
धरतीवर जमली पसरट,--!!!

दुपारचे ऊन,मध्यान्हाचे,
उष्ण उष्ण निखार,
मित्रराज" तळपता उभा,
रोपट्यांना फुटले धुमार,--!!!

वाढत गेला किरणांचा गरिमा,
झाडे सारी शोषती प्रकाश,
जीवन कसे तरारले,
हा निसर्गाचाच महिमा,--!!!

वाढे दुपारचे ऊन,
हळूहळू कलंडू लागे,
कलाकलाने मग ते सारे,
वामकुक्षी घेऊ लागे,--!!!

बराच काळ लोटला,
संध्या समय आला,
सोनेरी वातावरणाचा,
मुलामा,गगनी चढला,--!!!

आकाशातून ओघळते रंग,
त्यांना संधिप्रकाशाचा संग,
अंधाराचे वलय भोवती,
पक्ष्यांचे फडफडते पंख,--!!!!

हिमगौरी कर्वे



ऊन पडले कोवळे,
धरणीवर तरंगत आले,
प्रकाशाचे खेळ सारे,
किरण हवे तसे रमले,–!!!

आकाशाचा गोल घुमट,
कसा तापून गेला,
किमया कशी तेजाची,
धरतीवर जमली पसरट,–!!!

दुपारचे ऊन,मध्यान्हाचे,
उष्ण उष्ण निखार,
मित्रराज” तळपता उभा,
रोपट्यांना फुटले धुमार,–!!!

वाढत गेला किरणांचा गरिमा,
झाडे सारी शोषती प्रकाश,
जीवन कसे तरारले,
हा निसर्गाचाच महिमा,–!!!

वाढे दुपारचे ऊन,
हळूहळू कलंडू लागे,
कलाकलाने मग ते सारे,
वामकुक्षी घेऊ लागे,–!!!

बराच काळ लोटला,
संध्या समय आला,
सोनेरी वातावरणाचा,
मुलामा,गगनी चढला,–!!!

आकाशातून ओघळते रंग,
त्यांना संधिप्रकाशाचा संग,
अंधाराचे वलय भोवती,
पक्ष्यांचे फडफडते पंख,–!!!!

हिमगौरी कर्वे

Author