ओंजळभर मोती

ओंजळभर मोती,
आई तुझ्यासाठी,
कष्टलीस ग बाई,
सारखी संसारासाठी,--!!!

ओंजळभर सोनचाफा,
आई तुझ्यासाठी,
पोळल्या जिवाला गारवा,
मिळेल तुझ्यापाशी,--!!!

ओंजळभर मोगरा,
आई तुझ्यासाठी,
सौंदर्यातील सुगंधाने,
आत्मिक दुवा साधण्यासाठी,-!!

ओंजळभर चंदन,
आई तुझ्यासाठी,
उगाळून झिजलीस,
आमुच्या भल्यासाठी,--!!!

ओंजळभर मरवा,
आई तुझ्यासाठी,
सारखी फुलत राहशी,
तूच आमुच्यासाठी,--!!!

ओंजळभर अश्रू,
आई तुझ्यासाठी,
किती झालीस रिक्ती,
देणीघेणीअजून चालती,--!!!

हिमगौरी कर्वे.©



ओंजळभर मोती,
आई तुझ्यासाठी,
कष्टलीस ग बाई,
सारखी संसारासाठी,–!!!

ओंजळभर सोनचाफा,
आई तुझ्यासाठी,
पोळल्या जिवाला गारवा,
मिळेल तुझ्यापाशी,–!!!

ओंजळभर मोगरा,
आई तुझ्यासाठी,
सौंदर्यातील सुगंधाने,
आत्मिक दुवा साधण्यासाठी,-!!

ओंजळभर चंदन,
आई तुझ्यासाठी,
उगाळून झिजलीस,
आमुच्या भल्यासाठी,–!!!

ओंजळभर मरवा,
आई तुझ्यासाठी,
सारखी फुलत राहशी,
तूच आमुच्यासाठी,–!!!

ओंजळभर अश्रू,
आई तुझ्यासाठी,
किती झालीस रिक्ती,
देणीघेणीअजून चालती,–!!!

हिमगौरी कर्वे.©

Author