विपरित वागूनी मन, नाश करिते शरिराचा
वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा…१,
उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट
परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट….२,
मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते
मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते…३,
नाच गाणे देत असते, सूख नयनां – कर्णाला
शरिर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला….४
एक इंद्रियाची वासना, असती पूरक दुजाला
साध्य करण्यासाठीं हेच, जागृत ठेवावे मनाला…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Author
Post Views: 51
