कविता – कोण असेल ती …!

काळे दाट रेशमी कुंतले
पाहिले ज्यांनी ते गुंतले
कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती

सुंदर डोळे नजर बोलकी
गाली खळया गोड खुलती
डौलदार चालतांना टाकते
पावले एका लयीत ती

कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती

पाहाण्या मन भरूनी तिला
किती बहाणे करीती वेडे ते
डोळ्यासमोरूनी जाई जेंव्हा
नजरेचे त्यांच्या पारणे फिटते

कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती

-- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342

प्रकाशित - दिवाळी अंक- २०१८ -.दै.स्वतंत्र उज्वल भारत - धुळे .



काळे दाट रेशमी कुंतले
पाहिले ज्यांनी ते गुंतले
कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती

सुंदर डोळे नजर बोलकी
गाली खळया गोड खुलती
डौलदार चालतांना टाकते
पावले एका लयीत ती

कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती

पाहाण्या मन भरूनी तिला
किती बहाणे करीती वेडे ते
डोळ्यासमोरूनी जाई जेंव्हा
नजरेचे त्यांच्या पारणे फिटते

कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती

— अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342

प्रकाशित – दिवाळी अंक- २०१८ -.दै.स्वतंत्र उज्वल भारत – धुळे .

Author