मुरब्बी

लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर
आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर....१,

विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार
पक्वपणा त्याच्यातील, देई आनंदाला धार...२,

पक्वपणा येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी
ज्ञान तेव्हां चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही....३,

विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो
अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पावूल टाकतो...४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर
आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर….१,

विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार
पक्वपणा त्याच्यातील, देई आनंदाला धार…२,

पक्वपणा येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी
ज्ञान तेव्हां चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही….३,

विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो
अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पावूल टाकतो…४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →