कविता तीही लिहित असते
कविता मीही लिहित असतो
ती चंद्र- चांदण्यांची बात करते
मी स्वतः ला शोधत असतो
ती जर चंद्र - चांदण्यांतून हटली
मी जर स्वत:मधून निघालो
तर तिला मी दिसेल आणि मला ती
त्यानंतर दोघांच्याही भावना
उलगडत जातील एकमेकांना
जे कधीच आजपर्यंत दोघांकडूनही
बोललं गेलं नाही
जे तिच्याही मौनप्रेमातून हरवलं
जे माझ्याही निशब्दतेतून निसटलं
मग तिचंही प्रेम लख्ख उजळेल
माझाही प्रेमदीप प्रकाश देईल
नंतर काय सांगू मी आता
ती माझी होईल
अन् मी तिचा होईल
- ऋषिकेश तेलंगे
https://www.facebook.com/rushikesh.telange.9
कविता तीही लिहित असते
कविता मीही लिहित असतो
ती चंद्र- चांदण्यांची बात करते
मी स्वतः ला शोधत असतो
ती जर चंद्र – चांदण्यांतून हटली
मी जर स्वत:मधून निघालो
तर तिला मी दिसेल आणि मला ती
त्यानंतर दोघांच्याही भावना
उलगडत जातील एकमेकांना
जे कधीच आजपर्यंत दोघांकडूनही
बोललं गेलं नाही
जे तिच्याही मौनप्रेमातून हरवलं
जे माझ्याही निशब्दतेतून निसटलं
मग तिचंही प्रेम लख्ख उजळेल
माझाही प्रेमदीप प्रकाश देईल
नंतर काय सांगू मी आता
ती माझी होईल
अन् मी तिचा होईल
– ऋषिकेश तेलंगे
https://www.facebook.com/rushikesh.telange.9
Post Views: 20