तुझ्याच नगरी
तुझ्याच भोवती
तुझ्याचसाठी माझ्या लहरी…
तुझीच आस
तुझीच गाथा
तुझेच पारायण हृदयामधी…
तुझेच चालणे
तुझेच लाजने
तुझेच हास्य आनंदमयी…
तुझेच रूप
तुझेच बोल
तुझ्याच लीला माझ्या नयनी…
तुझाच ध्यास
तुझाच मोह
तुझाच गंध मनोमनी…
तुझेच वेड
तुझेच तर्हाणें
तुझेच ध्यान रात्रंदिनी…
तुझ्याशीच गाठ
तुझ्याशीच मैत्री
तुझ्याशीच प्रेम स्वप्नामधी…
तुझा तो कट्टा
तुझा तो सहवास
तुझ्या त्या आठवणी आयुष्यभरी.
— सुनील नागवे
sunilnagwe@gmail.com
Author
Post Views: 10