काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे ।

कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे.....१

बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने ।

यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने....२

निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती ।

शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती....३

लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता ।

छंद लागूनी नशाच चढली, जीवनामधील रंग बघता...४

त्या रंगाच्या छटा उमटल्या, फुला फुलातूनी दिसूनी येती ।

सप्त रंगाचे मिलन दिसले, आकाशाच्या क्षीतीजावरती....५

काव्यावरती जगेल कोण, हवी भाकरी जगण्यासाठी ।

मानहानी ती सदैव होई, केवळ अल्पशा पैशापोटी....६

मदत कुणाची मिळत होती, आला दिवस जाई निघूनी ।

काव्यातील आनंदात परि, डुबता सारे विसरूनी.... ७

विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फुर्ती देवता ।

अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता....८

अनुभव होता तना मनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते ।

उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते....९

लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी ।

परिस्थितीशी झगडा देवूनी, बाहेर आणती कुणी प्रसंगी....१०

गेलो विसरूनी उदास दिन , आज उमटले चित्र निराळे ।

सरस्वती नि लक्ष्मी दोघी, आशीर्वाद त्यांचा मिळे.... ११

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे ।

कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे…..१

बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने ।

यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने….२

निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती ।

शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती….३

लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता ।

छंद लागूनी नशाच चढली, जीवनामधील रंग बघता…४

त्या रंगाच्या छटा उमटल्या, फुला फुलातूनी दिसूनी येती ।

सप्त रंगाचे मिलन दिसले, आकाशाच्या क्षीतीजावरती….५

काव्यावरती जगेल कोण, हवी भाकरी जगण्यासाठी ।

मानहानी ती सदैव होई, केवळ अल्पशा पैशापोटी….६

मदत कुणाची मिळत होती, आला दिवस जाई निघूनी ।

काव्यातील आनंदात परि, डुबता सारे विसरूनी…. ७

विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फुर्ती देवता ।

अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता….८

अनुभव होता तना मनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते ।

उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते….९

लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी ।

परिस्थितीशी झगडा देवूनी, बाहेर आणती कुणी प्रसंगी….१०

गेलो विसरूनी उदास दिन , आज उमटले चित्र निराळे ।

सरस्वती नि लक्ष्मी दोघी, आशीर्वाद त्यांचा मिळे…. ११

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author