जन्मोजन्मी व्हावी वारी

धरली कास तुझ्या पायी माझा विश्वास

मुखी नामघोष तुला भेटण्याची आस ।।1।।

चारी वेद तुला गाती

विश्वव्यापक तू कमळापती।।2।।

अठरा पुराणांच्या अंती

साधू संत तुला ध्याती ।।3।।

क्षणोक्षणी येते तुझी मला प्रचिती

सुख-दुःखात देवा तू माझा सांगाती।।4।।

संत तुक्यासाठी तू सखा पांडुरंग

नामयाच्या कीर्तनात गातोस अभंग ।।5।।

जनीसाठी दळण, कान्होपात्रेला क्षमादान

हेची तुझे गुण, ऐकून तृप्त झाले कान ।।6।।

नको आता आम्हा विषयाची गोडी

देई तरी देई नामाची आवडी।। 7।।

देवा आता ऐसे करी

जन्मोजन्मी व्हावी वारी

जन्मोजन्मी व्हावी वारी।।8।।

शब्दातून साकारलेला विठ्ठल लक्ष देऊन पाहा भगवान परमात्मा पांडुरंग दिसेलच.

- अमोल उंबरकर



धरली कास तुझ्या पायी माझा विश्वास

मुखी नामघोष तुला भेटण्याची आस ।।1।।

चारी वेद तुला गाती

विश्वव्यापक तू कमळापती।।2।।

अठरा पुराणांच्या अंती

साधू संत तुला ध्याती ।।3।।

क्षणोक्षणी येते तुझी मला प्रचिती

सुख-दुःखात देवा तू माझा सांगाती।।4।।

संत तुक्यासाठी तू सखा पांडुरंग

नामयाच्या कीर्तनात गातोस अभंग ।।5।।

जनीसाठी दळण, कान्होपात्रेला क्षमादान

हेची तुझे गुण, ऐकून तृप्त झाले कान ।।6।।

नको आता आम्हा विषयाची गोडी

देई तरी देई नामाची आवडी।। 7।।

देवा आता ऐसे करी

जन्मोजन्मी व्हावी वारी

जन्मोजन्मी व्हावी वारी।।8।।

शब्दातून साकारलेला विठ्ठल लक्ष देऊन पाहा भगवान परमात्मा पांडुरंग दिसेलच.

– अमोल उंबरकर

Author