धोकेबाज

दगडाच्या नागोबाला पूजणारा
जीवंत नागाला मारतो
सांगा बरं मानव
असे का करतो...||1||

हनुमान असतो देव
म्हणत बसतो मंत्र
माकडांना हाकलून देतो
कसलं हे तंत्र...||2||

उंदराला म्हणतो वाहन
करतो त्याची आरती
विष देऊन मारतो
माणूस असतो स्वार्थी...||3||

कुत्रा म्हणे खंडोबा
चित्रापुरता असतो फक्त
त्याला दगडाने ठेचताना
कुठे जातो भक्त...||4||

दगडाला नैवेद्य असतो
दगड खेळतो तुपाशी
जीवंत कोटी कोटी देव
झोपतात रोज उपाशी...||5||

दगडाला देव मानणारा
माणसात मानतो भेद
जन्मदात्रीचा विटाळ त्याला
वाटत नाही खेद....||6||

जीवंत माणसालाही माणूस
माणसालाच वाटतेय लाज
माणसा रे भोंदू माणसा
तू स्वतःशीच धोकेबाज...||7||

-- विक्रम पाटील



दगडाच्या नागोबाला पूजणारा
जीवंत नागाला मारतो
सांगा बरं मानव
असे का करतो…||1||

हनुमान असतो देव
म्हणत बसतो मंत्र
माकडांना हाकलून देतो
कसलं हे तंत्र…||2||

उंदराला म्हणतो वाहन
करतो त्याची आरती
विष देऊन मारतो
माणूस असतो स्वार्थी…||3||

कुत्रा म्हणे खंडोबा
चित्रापुरता असतो फक्त
त्याला दगडाने ठेचताना
कुठे जातो भक्त…||4||

दगडाला नैवेद्य असतो
दगड खेळतो तुपाशी
जीवंत कोटी कोटी देव
झोपतात रोज उपाशी…||5||

दगडाला देव मानणारा
माणसात मानतो भेद
जन्मदात्रीचा विटाळ त्याला
वाटत नाही खेद….||6||

जीवंत माणसालाही माणूस
माणसालाच वाटतेय लाज
माणसा रे भोंदू माणसा
तू स्वतःशीच धोकेबाज…||7||

— विक्रम पाटील

Author