मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी,मर्यादेतचि जगती सारे ।
अनंत असता ईश्वर,मर्यादा घाली त्यास बिचारे ।।

जाण जगाची होई इंद्रियांनी,त्याला असती मर्यादा ।
विचार सारे झेपावती,ज्ञान शक्ती बधूनी सदा ।।

अथांग वाटे विश्वमंडळ,दाही दिशांचा भव्य पसारा ।
ईश्वर आहे थोर त्याहूनी,मोजमापाच्या उठती नजरा ।।

कशास करीतो तुलना सारी,भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी ।
अज्ञानाने पडती मर्यादा,अनंत तत्वास त्याच क्षणी ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author