प्रेम म्हणजे चांगूलपणा कळणं असतं
प्रेम म्हणजे सुखी स्व—जिवाला उगीचंच छळणं असतं !
प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं
प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं !
प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं
प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं !
प्रेम म्हणजे खिसा रिकामा होईस्तोवर पिळणं असतं
प्रेम म्हणजे अापण मित्रंच अाहोत हा मूग गिळणं असतं !
प्रेम म्हणजे अापल्या भावना अंतापर्यंत पाळणं असतं
प्रेम म्हणजे स्मितातून नेमका विशाद गाळणं असतं !
प्रेम म्हणजे अावडतीला परकी , पण सुखी पहाणं असतं
प्रेम म्हणजे मिळालेल्या माणसाची अावड जपणं असतं !
प्रेम म्हणजे मधुबालाचं निर्व्याज हसणं असतं
अाणि.....
प्रेम म्हणजे बायकोच अापली मधुबाला हे असणं असतं !
कवी : उदय गंगाधर सप्रेम
ठाणे
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेली कविता साभार प्रकाशित

अाणि…..