दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी,
तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी,
बराच वेळ लाट राहीली...१,

जेव्हा कुणीतरी क्रोध करी,
वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी,
दूषितपणा कांहीं काळ राहते...२,

निर्मळपणा दिसून येई,
स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा,
सारे होवून जाते गढूळ...३,

स्थिर होण्यास वेळ लागतो,
गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता,
वैमनस्य सहज होत...४

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



दगड टाकतां पाण्यावरी,
तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी,
बराच वेळ लाट राहीली…१,

जेव्हा कुणीतरी क्रोध करी,
वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी,
दूषितपणा कांहीं काळ राहते…२,

निर्मळपणा दिसून येई,
स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा,
सारे होवून जाते गढूळ…३,

स्थिर होण्यास वेळ लागतो,
गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता,
वैमनस्य सहज होत…४

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author