देह ईश्वरी रूप

स्नान करूनी निर्मळ मनीं,
दर्पणापुढे येऊन बसला ।
जटा साऱ्या एकत्र बांधूनी,
भस्म लाविले सर्वांगाला ।।

ओंकाराचा शब्द कोरला,
चंदन लावूनी भाळावरती ।
रूद्राक्षाच्या माळा बांधल्या,
गळा हात नि शिरावरती ।।

वेळेचे भान विसरूनी,
तन्मय झाला रूप रंगविण्या ।
प्रभू नाम घेत मुखानें,
नयन आतूर छबी टिपण्यां ।।

पवित्र आणि मंगलमय,
वाटत होते स्वरूप बघूनी ।
सजविला होता देह त्यानें,
प्रभूचेच एक रूप समजूनी ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



स्नान करूनी निर्मळ मनीं,
दर्पणापुढे येऊन बसला ।
जटा साऱ्या एकत्र बांधूनी,
भस्म लाविले सर्वांगाला ।।

ओंकाराचा शब्द कोरला,
चंदन लावूनी भाळावरती ।
रूद्राक्षाच्या माळा बांधल्या,
गळा हात नि शिरावरती ।।

वेळेचे भान विसरूनी,
तन्मय झाला रूप रंगविण्या ।
प्रभू नाम घेत मुखानें,
नयन आतूर छबी टिपण्यां ।।

पवित्र आणि मंगलमय,
वाटत होते स्वरूप बघूनी ।
सजविला होता देह त्यानें,
प्रभूचेच एक रूप समजूनी ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author