जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन ।

जाण त्याची येईल कोठून ।।

मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो ।

तेच सारे लक्षांत ठेवतो ।।

जीवनाच्या पायऱ्या मोजता ।

मना विचारा काय राहता ।।

ढोबळतेचा विचार येता ।

सूक्ष्मपणाला विसरूनी जातो ।।

मृत्यू येई हर घडीला ।

जाण नसते त्याची कुणाला ।।

गेला क्षण परत न येई ।

आयुष्य तेवढेच व्यर्थ होई ।।

समाधान जे मिळे तुम्हाला ।

देता किंमत प्रत्येक क्षणाला ।।

घटनांची क्रिया चाले सतत ।

झिजवावा देह ईश सेवेत ।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क - ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



क्षणा क्षणाला घटते जीवन ।

जाण त्याची येईल कोठून ।।

मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो ।

तेच सारे लक्षांत ठेवतो ।।

जीवनाच्या पायऱ्या मोजता ।

मना विचारा काय राहता ।।

ढोबळतेचा विचार येता ।

सूक्ष्मपणाला विसरूनी जातो ।।

मृत्यू येई हर घडीला ।

जाण नसते त्याची कुणाला ।।

गेला क्षण परत न येई ।

आयुष्य तेवढेच व्यर्थ होई ।।

समाधान जे मिळे तुम्हाला ।

देता किंमत प्रत्येक क्षणाला ।।

घटनांची क्रिया चाले सतत ।

झिजवावा देह ईश सेवेत ।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author