लोकशाही…२०१६

ना शरदा चे चांदणे
ना सोनियाचा दिस
घड्याळाचे ओझे हाताला
म्हणून आय्‌ कासावीस!

कमळाच्या पाकळ्यांची
यादवी छ्ळते मनाला
धनुष्य आलयं मोडकळीस
पण जाणीव नाही बाणाला!

विळा, हातोडा आणि कंदीलाला
आजच्या युगात स्थान नाही
डब्यांना ओढण्याइतकी
इंजिनात जान नाही!

मन आहे मुलायम
पण माया कुठेच दिसत नाही
हत्तीवरून फिरणारा
सायकलवर बसत नाही!

कितीही उघडी ठेवा कवाडे
प्रकाश आत जाणार नाही
विसरलेले आठवले तरीही
गवई गीत गाणार नाही!

बंडखोर पक्षांचा थवा
पार्टीसाठी आतूर
कुंपणच खातय शेताला
आणि बुजगावणंही फितूर!



ना शरदा चे चांदणे
ना सोनियाचा दिस
घड्याळाचे ओझे हाताला
म्हणून आय्‌ कासावीस!

कमळाच्या पाकळ्यांची
यादवी छ्ळते मनाला
धनुष्य आलयं मोडकळीस
पण जाणीव नाही बाणाला!

विळा, हातोडा आणि कंदीलाला
आजच्या युगात स्थान नाही
डब्यांना ओढण्याइतकी
इंजिनात जान नाही!

मन आहे मुलायम
पण माया कुठेच दिसत नाही
हत्तीवरून फिरणारा
सायकलवर बसत नाही!

कितीही उघडी ठेवा कवाडे
प्रकाश आत जाणार नाही
विसरलेले आठवले तरीही
गवई गीत गाणार नाही!

बंडखोर पक्षांचा थवा
पार्टीसाठी आतूर
कुंपणच खातय शेताला
आणि बुजगावणंही फितूर!

Author