दु:खात सर्व शिकतो

दु:खातची शिकतो सारे,

उघडोनी मनाची द्वारे ।

दु:खा परी नसे कुणी,

जो सांगे अनुभवाने ।।१।।

दु:ख मनावरी बिंबविते,

वस्तुस्थितीची जाणीव देते ।

दुसऱ्या परि आस्था देई,

जाणीव ठेवूनी कार्य करते ।।२।।

अधिकाराने माज चढतो,

खालच्यांना तुच्छ लेखतो ।

जाता हातातूनी अधिकार,

माणूसकी काय? हे कळणार ।।३।।

कष्ट करण्याची वृत्ती येते,

सर्वांना समावून घेते ।

श्रीमंतीमध्ये वाहून जाती,

आरामाची नशा चढती ।।४।।

गरीबी शिकवते मेहनत,

कष्टाने राही आनंदात ।

अनुभवासारखा शिक्षक,

नसे दुजा परि एक दु:ख ।।५।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



दु:खातची शिकतो सारे,

उघडोनी मनाची द्वारे ।

दु:खा परी नसे कुणी,

जो सांगे अनुभवाने ।।१।।

दु:ख मनावरी बिंबविते,

वस्तुस्थितीची जाणीव देते ।

दुसऱ्या परि आस्था देई,

जाणीव ठेवूनी कार्य करते ।।२।।

अधिकाराने माज चढतो,

खालच्यांना तुच्छ लेखतो ।

जाता हातातूनी अधिकार,

माणूसकी काय? हे कळणार ।।३।।

कष्ट करण्याची वृत्ती येते,

सर्वांना समावून घेते ।

श्रीमंतीमध्ये वाहून जाती,

आरामाची नशा चढती ।।४।।

गरीबी शिकवते मेहनत,

कष्टाने राही आनंदात ।

अनुभवासारखा शिक्षक,

नसे दुजा परि एक दु:ख ।।५।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author