वेड लावतोस तूं कुणां कुणां !

हे मुरलीधर मनमोहना,

वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//

तुझ्या भोवती नाचती गौळणी,

भान त्या तर गेल्या हरपूनी,

थकूनी गेल्या नाच नाचूनी,

विसरुनी गेल्या घरदारानां,

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना ।।१।।

रमले सारे गोकूळवासी,

पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी,

बागडती सारें तव सहवासी,

करमत नाही तुजविण त्यांना,

वेड लावतोस तू कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना ।।२।।

संसार सोडला राधेने,

भारुनी गेली तव प्रेमानें,

ध्यास घेतला तुझाच तिनें,

तुजविण नव्हती दूजी भावना,

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना ।।३।।

मीरेचे तर प्रेम निराळे,

विषालाही प्राशन केले,

तुजसाठी सर्वस्व अर्पिले,

कसा तारशी तूं भक्तांना,

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



हे मुरलीधर मनमोहना,

वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//

तुझ्या भोवती नाचती गौळणी,

भान त्या तर गेल्या हरपूनी,

थकूनी गेल्या नाच नाचूनी,

विसरुनी गेल्या घरदारानां,

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना ।।१।।

रमले सारे गोकूळवासी,

पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी,

बागडती सारें तव सहवासी,

करमत नाही तुजविण त्यांना,

वेड लावतोस तू कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना ।।२।।

संसार सोडला राधेने,

भारुनी गेली तव प्रेमानें,

ध्यास घेतला तुझाच तिनें,

तुजविण नव्हती दूजी भावना,

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना ।।३।।

मीरेचे तर प्रेम निराळे,

विषालाही प्राशन केले,

तुजसाठी सर्वस्व अर्पिले,

कसा तारशी तूं भक्तांना,

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author