संयुक्त अरब अमिरातीचा ५० वा राष्ट्रीय दिवस

२ डिसेंबर १९७१ या दिवशी, संयुक्त अरब अमिराती ची स्थापना करण्यात आली व अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या सात अमिरातींनी संयुक्त अरब अमिराती या नावाने एक संघराज्य बनवले.



२ डिसेंबर १९७१ या दिवशी, संयुक्त अरब अमिराती ची स्थापना करण्यात आली व अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या सात अमिरातींनी संयुक्त अरब अमिराती या नावाने एक संघराज्य बनवले. रस अल-खैमा १९७२ मध्ये त्यात सामील झाले. १६व्या शतकाच्या सुरुवातीस येथे पोर्तुगिजांचा शिरकाव झाला. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने येथे प्रवेश केला. १८२० मध्ये ब्रिटिशांनी येथील राजांशी शांतता करार केला. १८५३ पासून ब्रिटिशांनीच येथील कारभार चालवला तरी त्यांना संपूर्ण सत्ता कधीच मिळाली नाही.

१९७१ मध्ये येथील शेख यांनी ब्रिटिशांबरोबरचा करार रद्द केला व सहा सदस्यीय समिती स्थापन केली. १९९१ मध्ये अमिरातिने इराकविरुध्दच्या युध्दात संयुक्त फौजांना मदत केली. संयुक्त अरब अमिरातीची लोकसंख्या आज एक कोटीच्या आसपास आहे. तीस वर्षांपूर्वी हीच लोकसंख्या केवळ वीस लाख होती. तेलसाठ्याच्या बाबतीत संयुक्त अरब अमिराती हा जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे. त्याची अर्थव्यवस्था मध्य पूर्व आशियातील सर्वात विकसित अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author