Year: 2022
समर्पितांच्या सहवासात….
Category:
लेखसंग्रहमनस्वी वृत्तीची माणसे स्वप्नांचे पाठलाग सहसा सोडत नाही. ठरविलेल्या प्रघातांची, परिघांची चाकोरी सोडत नाही आणि बघता-बघता एका उंचीवर पोहोचतात. आपल्यालाही त्यांच्यात सामील करून घेतात. अशांच्या समूहात मग स्वतःलाच उत्साही वाटायला सुरुवात होते, त्यांच्या आदरातिथ्याने भारावयाला होते आणि त्यांच्या सहवासानंतर अतृप्ती घेऊन परतावे लागते.
बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १२ – विज्ञाननिष्ठ सावरकर
Category:
साहित्य - ललितसावरकर विज्ञाननिष्ठेचे कट्टर पुरस्कर्ते होते. कोणतीही गोष्ट विद्यानाच्या कसोटीवर पारखल्याशिवाय ती आचरणात आणायची नाही ही त्यांचे सांगणे होते. राष्ट्राची प्रगती व्हावी व ती विज्ञाननिष्ठेनेच होईल अशी त्यांची धारणा होती.
मधुस्पर्श
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
ठाण्याची नाटकमंडळी
Category:
लेखसंग्रहजुन्या काळात नाट्यसंस्थांना ‘नाटक मंडळी’ असेच म्हटले जाई. म्हणजे ‘गंधर्व नाटक मंडळी’, ‘शाहूनगरीवासी नाटक मंडळी’, ‘राजाराम नाटक मंडळी’, असे. त्या काळात नाट्यसंस्था म्हणजे एक कुटुंबच असे. ज्या शहरात नाट्यप्रयोग करायचे तिथे एखाद्या चाळीत, वाड्यात खोल्या भाड्या घेऊन मंडळी उतरायची. नाटक कंपनीच्या त्या ताफ्यात स्वयंपाक करण्यापासून ते डोअरकीपिंग करण्यापर्यंत सगळी कामे करायला माणसे असत. मुख्य नटांचा पगार ठरलेला असे. तो शक्यतो वेळच्या वेळी केला जाई. नटांची तालीम घ्यायला तालीम मास्तर (आजचे दिग्दर्शक हो!) असायचे.
चार’ असतात ‘पक्षिणी’ त्या ! रात असते ‘कायमची’ वादळी !!
Category:
लेखसंग्रहकुसुमाग्रजांनी “वीज म्हणाली धरतीला ” (१९७०) मध्ये लखलखणाऱ्या झाशीच्या राणीचे आणि तिच्या विस्तवाला प्राक्तन बांधलेल्या सहेल्यांचे हे घायाळ करणारे वर्णन लिहिलंय. आमचे गुलज़ार महोदय ” नमकीन ” (१९८२) मध्ये असेच तीन निखारे (शर्मिला, शबाना आणि किरण वैराळे) उशाला घेऊन निजणारी वहिदा रंगवितात, पुन्हा चार पक्षिणी !
ब्लड प्रेशर मॉनिटर
Category:
लेखसंग्रहॲनरॉईड प्रकारची उपकरणे ही एकट्याला वापरणे अवघड असल्याने तसेच त्यात वारंवार रीडिंगचे सेटिंग करावे लागते. त्यामुळे डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर वापरणे अधिक योग्य असते. त्यात एक धाग्यांची बनवलेली पट्टी असते त्याला एलसीडी पॅनेल जोडलेले असते. रक्तदाब मोजताना ती पट्टी हाताच्या दंडाजवळ गुंडाळली जाते व नंतर एक आवाज येतो, तो इलेक्ट्रिक मोटरचा असतो. छोट्याशा पंपाने ती पट्टी फुगवली जाते व नंतर हवा सोडलीही जाते. त्यातून सिस्टीलिक व डायस्टॉलिक हे रक्तदाबाचे आकडे एलसीडी पडद्यावर दिसतात.