माणूस या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक श्री. ग. माजगांवकर
Category:
व्यक्ती-परिचय‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध नि:शब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा.