एक अजून साल
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
साहित्य - ललितकृतज्ञता ही कदाचित एकमेव अशी भावना असेल जिचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव येतोच पण ती अभावानेच व्यक्त होते. एकतर आपण इतरांना गृहीत धरत असतो आणि त्यात काय मोठं? ते त्या व्यक्तीचं कामच आहे. त्यासाठी त्याला पगार मिळतो, मग वेगळं कौतुक /कृतज्ञता यांची गरज काय? किंवा आपण बर्याच गोष्टींवर आपला हक्क मानत असतो. अशावेळी या ना त्या कारणाने कृतज्ञता राहूनच जाते.
Category:
साहित्य - ललितगोपाळ देऊसकर यांनी बालगंधर्व रंगमंदिरासाठी, बालगंधर्वांची दोन रूपातील केलेली पूर्णाकृती चित्रे सुप्रसिद्ध आहेत. ही चित्रे करण्यासाठी माॅडेल म्हणून ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते, विवेक यांची निवड केली होती. स्त्री रुपातील रुक्मिणीचा हात चितारताना मऊसुत, गुलाबी रंगाचा पंजा असणारी स्त्री, गोपाळ देऊसकरांना हवी होती. हृदयनाथ मंगेशकरच्या लग्न समारंभात, कॅमल कंपनीच्या मालकांची पत्नी, रजनी दांडेकर हिचा हात पाहिल्यावर गोपाळ देऊसकरांना चित्रासाठी तो योग्य वाटला. ही रजनी, पूर्वाश्रमीची संगीत रंगभूमीचे गायक नट, अनंत वर्तक यांची कन्या होती. तिचा हात पाहून त्यांनी तो हुबेहूब चितारला व चित्राला जिवंतपणा आला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteव्हॅन शिप्ले एक महान वादक व संगीतकार होते. त्यांनी १५०० हून अधिक चित्रपटां मध्ये गाणी वाजवली होती. ५० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा बरसात चित्रपटाच्या यशाने त्यांचे नाव एचएमव्ही या रेकॉर्डिंग कंपनीच्या चित्रपटातील गाण्यांच्या इंस्ट्रुमेंटल आवृत्त्यांचे रेकॉर्डिंग करणारे ते पहिले होते. एचएमव्हीने त्यांना वैयक्तिक वादक म्हणून साइन केले. त्यांचे पहिला रेकॉर्ड गिटारवर सादर केलेला तुम भी भूल दो (जुगनू)चे गाणे होते.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानभारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Category:
कथा साहित्य - ललितसर्वांची उधार देण्याची मर्यादा संपली की गोमु एखादी तात्पुरती नोकरी शोधी. पैसे हातात आले की बरीचशी उधारी फेडून टाकी आणि परत उधार घ्यायला मोकळा होई. उधारी करणे हे आपण मराठी माणसे कमीपणाच कां मानतो कुणास ठाऊक! तसं तर म्हणतात की मानव अथवा त्याचा आत्मा हे शरीर निसर्गाकडून उधारच घेतो आणि जातांना परत निसर्गांतच सोडून जातो.
Category:
साहित्य - ललितकाय रे केदार, असा का बसला आहेस डोक्याला हात लावून? बरं वाटत नाही का? आणि इतका उशीर?” प्रदीपने-केदारच्या मित्राने-विचारलं. केदार म्हणजे एक उमदा, सतत हसतमुख असणारा. वेळेच्या बाबतीत काटेकोर, कामात चोख.
Category:
लेखसंग्रहआपण असं शिकायला हवं जणू आपण नेहमीसाठी जगणार आहोत आणि असं जगायला हवं जणू उद्याच मरणार आहोत. विद्येसारखा बंधू नाही. विद्येसारखा मित्र नाही. विद्येसारखे धन नाही, आणि विद्येसारखे सुखही नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti