व्यक्ती-परिचय

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी के नायर

Category:

 

भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, अन्द्रेज वाजदा, क्रिस्तोफ झानुसी, फेडेरीको फेलिनी, विटोरोयो डे सिका इत्यादी परदेशी दिग्दर्शकाचे ४,००० चित्रपट संग्रहित आहेत.

व्यक्ती-परिचय

प्रसिद्ध प्रख्यात गणिती आणि भूगोलतज्ज्ञ मर्केटर गेरहार्ट

Category:

 

मर्केटर गेरहार्ट यांना नकाशा शास्त्राचे जनक मानले जाते. टॉलेमी यांच्या जगाच्या नकाशाची मदत घेऊन १५३८ मध्ये मर्केटर गेरहार्ट यांनी जगाचा नकाशा तयार केला. १५४१ मध्ये १.३० मीटर परिघाचा पृथ्वीचा गोल करून त्याच धर्तीवर १५५१ मध्ये गेरहार्ट यांनी तारामंडळाचा गोल बनविला.

साहित्य - ललित

लग्नाची बेडी – Part 2

Category:

 

पंधरा-वीस दिवसांनी एके दिवशी पहाटे पाच वाजताच राहुल आणि विभा येतात. विभा जीन्स आणि टॉपमध्ये, बॉबकट, तिचे स्वागत जरा नाराजीनेच होते. दोघेही चहा घेतात. थोडा आराम करून नऊ वाजता सगळे डायनिंग टेबलवर जमतात. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर राहुल म्हणतो,

“आई-बाबा ही विभा. विभावरी कुलकर्णी आमच्या ऑफिसमधली माझी कलिग नुकतीच आमच्या कंपनीत जॉईन झाली आहे. हिचे आई बाबा बंगलूरला असतात. आज संध्याकाळी येतील तिला न्यायला.”

व्यक्ती-परिचय

पुण्याचे पहीले आयुक्त सदाशिव गोविंद बर्वे उर्फ स गो बर्वे

Category:

 

१९५३ मध्ये पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले. या काळात आंतरराज्य विक्रीकर कायदा, खासगी विमा कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण झाले. पुढे १९५७ मध्ये ते PWD चे सचिव झाले. या काळात कोयना धरण बांधायला जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्थखात्याचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेला गेले, कोयना धरणासाठी त्यांनी अडीच कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले.

कसोटी क्रिकेट’ ची सुरुवात
दिनविशेष

कसोटी क्रिकेट’ ची सुरुवात

Category:

 

पहिला चेंडू टाकणारे होते इंग्लंडचे आल्फ्रेड शॉ. त्यांच्यासमोर होते ऑस्ट्रेलियन फलंदाज चार्ल्स बॅनरमन. त्यांनी त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कसोटी क्रिकेटमधली पहिली धाव घेतली. त्यांनीच दुसऱ्या दिवशी पहिले शतक पूर्ण करताना १६५ धावा केल्या. या सामन्याला कसोटी दर्जा नंतर बहाल करण्यात आला. सुरुवातीला या सामन्याचे स्वरूप ऑल इंग्लंड वि. कम्बाइन्ड न्यू साउथ वेल्स अँड व्हिक्टोरिया इलेव्हन असे होते.

व्यक्ती-परिचय

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

Category:

 

शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असणाऱ्या विनायक राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेतून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. १९८५ मध्ये महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९९२ पर्यंत विनायक राऊत पालिकेत होते. १९९९ साली विनायक राऊत विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेले.

दिनविशेष

लिज्जत पापड (श्री महिला उद्योग) चा वर्धापनदिन

Category:

 

महाराष्ट्रात, मुंबईत स्त्रियांनी स्त्रियांकडून स्त्रियांसाठी स्त्रियांद्वारे चालविलेला उद्योग निर्माण झाला. १५ मार्च १९५९ साली गिरगावमधील सात महिलांनी या उद्योगास जन्माला घातले. ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या नावाने आज हा उद्योग जगभर पोहोचला.