No Picture
लेखसंग्रह

जीवनाचे धडे आणि स्वतःशी करार

Category:

 

इतरांचे आपल्याबद्दलचे मत,निरीक्षण सरळ दुर्लक्ष करावे या वैचारिक समृद्धीपर्यंत मी काही वर्षांपूर्वी पोहोचलो. माझ्यावरील संस्कार, माझे पालक, गुरुजन आणि माझा जीवनप्रवास यांच्याबद्दल कृतज्ञता हा सध्या स्थायीभाव केलाय! बाकीचे शांतपणे कुंपणापलीकडे ठेवतो मी.

No Picture
साहित्य - ललित

खांदा

Category:

 

एक नामांकित अभिनेत्री; पण काही वर्षांपूर्वीची. एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी. खरं तर अभिनयाची संधी तिला फार उशिरा मिळाल्यामुळे त्या वयानुसार भूमिका वाट्याला यायच्या, पण त्या सगळ्या तिने अजरामर केल्या. आता मात्र सगळंच चित्र बदललं होतं. एव्हाना लोकांना तिचा विसरच पडला होता. नव्याच्या झगमगाटापुढे जुनं झाकोळलं गेलं. मानमरातब, प्रसिद्धी, पैसा सगळं गेलं अन् शिवाय भरीला वार्धक्य आलं. दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात एकटीच राहायची. घरकाम, स्वयंपाकाला एक बाई यायच्या तेवढंच काय ते. बाकी दिवस ढकलणं सुरू होतं फक्त.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जागतिक दृकश्राव्य वारसा दिवस

Category:

 

दृकश्राव्य दस्तावेजांचे महत्त्व जाणून त्यांच्या जतनासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने युनेस्कोतर्फे २००५ सालापासून २७ ऑक्टोबर या दिवशी जागतिक दृकश्राव्य वारसा दिवस (World Day for Audio visual Heritage) साजरा केला जातो.

No Picture
लेखसंग्रह

फायब्रोस्कोप (एंडोस्कोप)

Category:

 

फायब्रोस्कोप म्हणजेच एन्डोस्कोप नावाच्या यंत्राने आपल्याला मानवी अवयवांची अत्यंत अचूक अशी तपासणी करता येते. सर्पिलाकार दिसणाऱ्या या अवयवाने केल्या जाणाऱ्या तपासणीला एन्डोस्कोपी म्हणतात. ही एक प्रकारची दुर्बीण असते व ती मानवी शरीरात घालून कुठे काय झाले आहे हे पाहता येते.

No Picture
लेखसंग्रह

कालसुसंगत (Relevant)

Category:

 

दिवसागणिक अशा प्रयॊग करणाऱ्यांची आणि काळाशी सुसंगत राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांची माझी यादी वाढत आहे. हा relevance खाद्य संस्कृती,करमणूक क्षेत्र, वाहन व्यवसाय आणि अशा सगळ्या दिशांनी पसरत चाललाय.

No Picture
लेखसंग्रह

श्री पुण्डरीक विरचित तुलसी स्तोत्रम् – मराठी अर्थासह

Category:

 

तुलसी आणि तिला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व याबद्दल अनेक कथा पुराणांतरी सापडतात. तुळस विष्णूपत्नीस्वरूपच असल्याने तिला विष्णूपूजेत महत्त्वाचे स्थान आहे. तुळशीला उद्देशून हे प्रार्थनास्तोत्र संत पुण्डरीक यांनी रचले आहे. तामीळनाडूमधील तिरुकडलमलै या गावी त्यांचे वास्तव्य होते. श्रीविष्णूंच्या नित्यपूजेत ते कमल फुलांचे उपयोजन करीत असत. एके दिवशी त्यांना भगवंताने गरीब भुकेल्या ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले. त्याचेसाठी पुण्डरीक अन्न घेऊन येईपर्यंत त्या  ब्राह्मणाचे विष्णुमूर्तीत व कमळांचे तुलसीपत्रांत रूपांतर झाले होते. या प्रसंगानंतर त्यांनी या स्तोत्राची रचना केली. 

No Picture
साहित्य - ललित

धडाकेबाज इग्नेश्यस

Category:

 

इग्नेश्यस अगार्बी जेव्हा नायजेरियाचा वित्तमंत्री म्हणून नेमला गेला तेव्हा कुणालाही आश्चर्य वाटलं नाही. साहजिकच आहे, गेल्या सतरा वर्षातला तो सतरावा वित्तमंत्री झाला होता ना. नेमणूक झाल्यावर पार्लमेंटमधल्या पहिल्याच भाषणात त्याने ठणकावून सांगितलं की तो समाजातली लाचलुचपत, भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून टाकण्यासाठी वित्तमंत्री झाला आहे, ज्या सरकारी अधिकाऱ्याचं वर्तन धुतल्या तांदळासारखं नसेल अशानं हा स्पष्ट इशारा समजून सरळ मार्गावर यावं अन्यथा त्याची गय केली जाणार नाही. भाषणाची अखेर त्यानं ‘नायजेरियाला लागलेली ही कीड मी निर्दयपणे चिरडून टाकणार आहे’ या