चालक
Category:
लेखसंग्रहकधीही कुठेही जायचे झाले की बस मधून जावे लागत असे. तिकीट काढून सगळे जागेवर बसले आणि खात्री करून वाहक दोरी ओढून चला असा संकेत देतात. प्रवासी आपापल्या परीने जेवण. झोप. गप्पा. वाचन. आणि आता मोबाईल फोन वगैरे मध्ये गुंगतात. पण त्याला मात्र एकाच जागी बसून लक्ष केंद्रित करुन अगदी जागरूक पणे जबाबदारी पार पाडावी लागते. आपल्या इच्छित स्थळी प्रवासी उतरतात चढतात. त्यामुळे इथेही तो जागरूक असतो.