प्रतिकृती (कथा)-भाग-३
Category:
साहित्य - ललितगावी पोचायला दोन दिवस लागले. आई शेवटच्या घटका मोजत होती. मला पाहून तिला खूप बरं वाटलं आणि आश्चर्य म्हणजे तिची प्रकृती सुधारू लागली. पण तिने एकच ध्यास घेतला, “बाज्या, आता तू पुन्हा जाऊ नकोस. पुरं झालं ते संशोधन! तुला इथे काय कमी आहे. तू आता इथेच माझ्याजवळ राहा. लग्न कर, मला नातू पाहू दे.” तसं तर मोठा भाऊ होताच. त्याची मुलं पण होती. पण ती कुणाचंच ऐकेना. शेवटी आता ही काही फार दिवसांची सोबती नाही असा विचार करून मी होकार दिला. तिच्या पसंतीची मुलगी पाहून लग्नही केलं.