एकविसाव्या शतकातील मातृभाषेचे स्थान : भाग २ – अ
Category:
साहित्य - ललितआपण भाषेच्या शुद्धपणाचा परकीय भाषेच्या संदर्भात विचार केला. आतां आपण त्याचा विचार लोकभाषेच्या दृष्टीकोनातून करूं या. त्यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्व नाहीसं करून टाकील, असा निष्कर्ष निघतो कां तें. आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्यांची भाषा असते. तिला प्रतिष्ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्व टिकून राहतं.
March 16, 2019