साहित्य - ललित
सोरड
Category:
साहित्य - ललितपिकांनी माना टाकल्या होत्या. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत होता. नद्या आटलेल्या , कोरडयाठाक पडलेल्या होत्या. अंगाभेवती चिलटं घोंगावेत. पुन्हा हातानं हानावेत. तशी माणसं कावल्यागत झाल्ती . पावसाचा शिपका जूनमधी पडून गेल्ता. त्यानंतर गोमतार शिंपडल्यावाणी तरी यायचं त्यांनी. चार- दोन ढगं आभाळात यायचे .